Aajcha Havaman Aandaj गणेशोत्सवाच्या काळात काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
हवामान खात्याच्या अहवालानुसार, या जिल्ह्यांमध्ये पावसासोबत वारे दर तासाला ४० ते ६० किलोमीटरच्या वेगाने वाहणार आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग आणि सोलापूर येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये आणि पावसाची माहिती नियमितपणे तपासत राहावी.
सूचना: हवामानाच्या परिस्थितीबाबतचे अलर्ट आणि अंदाज वेळोवेळी बदलत राहतात. नागरिकांनी अधिकृत हवामान स्रोतांचा वापर करून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.