Ladki Bahin Installment मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. रक्षाबंधनाच्या आधी जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता होती.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार?
नवीन अपडेटनुसार, लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्टच नाही तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात. हा हप्ता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर गणेश चतुर्थी किंवा गौरी आगमनाच्या दिवशी देण्यात येऊ शकतो. तथापि, राज्य सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिलासा देणारे वक्तव्य केले. त्यांनी स्पष्ट केले की योजना निवडणुकीपुरती नाही तर पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. याशिवाय, योग्य वेळी हप्त्याची रक्कम वाढवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना होणारा फायदा
ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांच्या हातात दरमहा आर्थिक मदत पोहोचते आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर गरजांसाठी हा पैसा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठा हातभार मिळत आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती विविध वृत्तस्त्रोत व उपलब्ध अहवालांवर आधारित आहे. योजनेबाबतची अंतिम व अधिकृत घोषणा राज्य सरकार किंवा संबंधित विभागाकडूनच करण्यात येईल. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ किंवा शासकीय आदेशांचा संदर्भ घ्यावा.