27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर सलग 11 दिवस पावसाचा कहर पंजाब डख यांचा तातडीचा अलर्ट! Panjab Dakh Havaman Live

२७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर सलग ११ दिवस पावसाचा कहर पंजाब डख यांचा तातडीचा अलर्ट! Panjab Dakh Havaman Live

Panjab Dakh Havaman Live राज्यात गनेशोत्सवाच्या काळात पावसाची जोरदार शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी वर्तवली आहे. २७ ऑगस्टपासून ५ सप्टेंबरदरम्यान सलग ११ दिवस पावसाचे प्रमाण वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त पाऊस

हवामान अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे.

विदर्भातील: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असेल.

मराठवाड्यातील: संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडेल.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस

कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र या भागांतही पावसाची शक्यता वर्तवली असली, तरी येथे पावसाचा जोर विदर्भ आणि मराठवाड्याइतकासा राहणार नाही. या भागांत मुख्यतः मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना

शेतकऱ्यांना पावसापूर्वी शेतीची कामे पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. आज आणि उद्या दुपारपर्यंत लागणारी शेतीची महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत, कारण उद्या दुपारनंतर अनेक भागांत पावसाची सुरुवात होऊ शकते. विशेषतः नांदेड, लातूर आणि यवतमाळ परिसरात आज रात्रीपासूनच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

गनेशोत्सवात पावसाचे वातावरण

गणरायाच्या आगमनाच्या दिवसांपासूनच पावसाचे आगमन होणार असल्याने राज्यात गनेशोत्सव पावसाच्या सरींसह साजरा होण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, मात्र अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी आव्हानेही निर्माण होऊ शकतात.

डिस्क्लेमर: वरील माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजांवर आधारित आहे. प्रत्यक्ष परिस्थितीत बदल होऊ शकतो. याचा वापर शेतकरी व नागरिकांनी फक्त मार्गदर्शन म्हणून करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

सरकारी⚡ ग्रुप जॉईन 👉
Scroll to Top